तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

CMP प्रणाली द्वारे वेतन करा


महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती ची मागणी

 जिंतुर :शिक्षकांचे वेतन CMP  प्रणाली द्वारे वेतन करा....महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने वेळोवेळी पगाराबाबत पाठपुरावा करण्यात आला असून शिक्षकांचा पगार थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी CMP वेतन प्रणाली द्वारे करण्यात यावा या मागणीसाठी मा. श्री शिवाजी कांबळे, गट विकास अधिकारी जिंतुर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या प्रणाली द्वारे वेतन मिळाल्यास बँकेतील गर्दी कमी होण्यासाठी मदत होणार आहे, त्यामुळे सध्या च्या साथीच्या आजारावर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल व मुख्याध्यापक यांना ही चेक जमा करण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही, तसेच या प्रणाली द्वारे थेट पगार शिक्षकांच्या खात्यात जमा होणार असल्याने पगारास होणारा विलंबही टाळता येणार आहे,यासाठी आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष सोपान खताळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सोपान खताळ, सचिव शिवाजी दराडे, कार्यध्यक्ष-परमेश्वर मेंनकुदले, कोषाध्यक्ष माधव खुडे संघटनेतील इतर पदाधिकारी केशव घुगे, दत्तराव पोले, शिवाजी माळी, कैलास कपाळे, मनोज तोडकर, सुभाष सानप ,तुषार कल्याणकर, प्रसाद मोरे, रामप्रसाद घुले, इत्यादी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत

No comments:

Post a comment