तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

स्व.सी.दुर्गाताई द कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त K-YAN मशीन शाळेस भेटसेलू, दि. १ ( प्रतिनिधी )  : नूतन विद्यालय  शिक्षण संस्था संचालित नूतन कन्या प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द. कुलकणी स्मृती ग्रंथालयाच्या वतीने वाचन संस्कृती या विषयावर शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी बेबीनार संपन्न झाला. या वेळी स्व.सौ.दुर्गाताई द कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त K-YAN मशीन शाळेस भेट म्हणून देण्यात आली. 
कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांची आध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक.श्री.प्रभाकर साळेगावकर होते. व्यासपीठावर संसंस्थेचे सचिव डी. के. देशपांडे, सहचिटणीस डॉ. व्ही. के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, मा.श्री.नंदकिशोरजी बाहेती, दत्तराव पावडे , प्राचार्य डॉ.शरद.एस.कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता खराबे , उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे यांची उपस्थिती होती

यावेळी पाहुण्याच्या हस्ते दुर्गाताई यांच्या कार्या विषयीचे भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे वक्ते जेष्ठ साहित्यिक श्री.प्रभाकर साळेगावकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ग्रंथालयास पुस्तक भेट देण्याची पद्धत सुरु केली पाहिजे तसेच वाचन संस्कृतीची आवड जाणीव पुर्वक रुजवली पाहिजे. दुर्गा ताई सेलूचे भुषण आहेत त्यांचे कार्य विद्यर्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत व्यक्त केले. आणि एका छान कवितेचे सादरीकरण केले. 
वाचकप्रेमी ३० शिक्षकांनी एक वर्षाची शै.मासिक वर्गणी फीस रुपये ३३१, पुस्तकाच्या देणगी स्वरूपात शाळेच्या ग्रंंथालयास दिली. कार्यक्रमासाठी श्रीमती ललिता गिलडा, महिलावर्गाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे शिवाजी व सौ.देशमुख यांनी केले.

(प्रतिनिधी : बाबासाहेब हेलसकर)

.....

No comments:

Post a comment