तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

वसुंधरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य108 डॉ.श्री. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्री गुरुलिंग स्वामी संस्थान तथा श्री वक्रेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे आदरांजली वाहण्यात आली


आज दिनांक 4/09/2020 रोजी श्री गुरुलिंग स्वामी संस्थान व वक्रेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने परऴी वैजनाथ तर्फे वसुंधरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य श्री 108 डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली, ट्रस्टच्या वतीने महाराजां बद्दल श्री गुरुलींग स्वामी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री दत्ताप्पा       ईटके गुरुजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हनाले की डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी विरशैव समाजासाठी खुप मोठे कार्य केले त्यात समाजप्रबोधन असेल , पायीदिंडी सोहळे असतील, प्रवचन असेल, अनुष्ठान असतील, मौन व्रत असतील असे अनेक प्रकारे ते समाजासाठी कार्य करत, त्यातच महाराजांचे बेलवाडी मधे दर महीन्याला सत्संगसाठी येत असत व परळीत झालेला माहराजांचा 82 वा तपोनुष्ठान सोहळा त्यासाठी महाप्रसादाचे आयोजन हे श्रीगुरुलिंग स्वामी मंदिर व परीसरात झाले होते, अशा अनेक आठवणींना ईटके गुरुजींनी उजळा दिला व आदरांजली वाहिली, कार्यक्रमासाठी, श्री गुरुलिंग स्वामी संस्थान चे अध्यक्ष श्री दत्ताप्पा ईटके गुरुजी , श्री वक्रेश्वर मंदिर चे अध्यक्ष श्री सोमनाथप्पा हालगे व सर्व विश्वस्त सर्व श्री विजयकुमार मेनकुदळे, किर्तीकुमार नरवने, गिरीश चौधरी, रत्नेश्वरप्पा कोरे, रामलींगप्पा काटकर, शंकरप्पा उदगीरकर, शिवशंकरप्पा निर्मळे, नारायनप्पा खके, शिवकुमार व्यवहारे, सुभाषप्पा भिंगोरे, विठ्ठलप्पा चौधरी, चंद्रकांतप्पा समशेट्टी, अक्षयप्पा मेनकुदळे, विश्वनाथप्पा हरंगुळे व बेलवाडी मंदिर चे व्यवस्थापक विश्वनाथ स्वामी, उपस्थित होते..

No comments:

Post a comment