तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

जिल्ह्यात 14 ते 20 सप्टेंबर रोजी भाजपाचा सेवा सप्ताह , जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व युवक जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांची माहितीबीड (प्रतिनिधी) :- पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष, महात्मा गांधी जयंती व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर रोजी सेवासप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमा संदर्भात माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळंकट चाटे यांनी सेवा सप्ताहाच्या कार्यरूपरेषा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           या सेवा सप्ताहात 70 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 70 गरीब वस्त्यांमध्ये किंवा रूग्णालयात फळांचे वाटप, 70 जणांना प्लाझ्मा दान करण्यात येईल, 70 ठिकाणी मास्कचे वाटप करण्यात येणार, 70 दिव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरण देण्यात येणार,70 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ते 20 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष, महात्मा गांधी जयंती व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर रोजी सेवासप्त राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व युवा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिली आहे.

No comments:

Post a comment