तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

हिंगोली येथें 17 लाख 47 हजाराचा बनावट नोटासह 24 लाखाचा एवज पोलिसांकडून जप्त

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली शहरातील आनंदनगर अकोला बायपास भागातील एक पुरुष आणि महिला बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणत असल्याची गुप्त माहिती मिळाल्या वरून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने आणि दहशत वरोधी पथकाचे ओंमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 17लाख 47 हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि ईतर मुद्देमाल एकुन 24लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहें या बाबत एका आरोपीला अटक करण्यात आली असून महिला आरोपी फरार जाली आहें या बाबत हिंगोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या माहिती नुसार अकोला बायपास भागातील आनंदनगर येथें काही जन बनावट नोटा तयार करीत असल्याची माहिती हिंगोली पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून हिंगोली येथील शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने दि .02/09/2020 वार बुधवार ला सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटानी आरोपी भाड्याने राहत असलेल्या अरुण हणवते यांच्या घरी छापा टाकून या छाप्यात पोलिसांनी 17लाख 47 हजार 350रुपये व 20 हजार रुपयाच्या खऱ्या नोटा आणि मशीन व ईतर नोटा बनवायचे साहित्य प्रिंटर 17हजार 945 रुपये व एक चार चाकी गाडी  6 लाख 45 हजार रुपयाची गाडी असा एकुन 24 लाख 30हजार 345 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहें व एका आरोपीला अटक करण्यात आली आहें  संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख )या आरोपीला अटक करण्यात आली आहें पोलिस स्टेशन हिंगोली येथें त्यांच्या विरुध्द व छायाबाई गुलाबराव भूक्तर यांच्या विरुध्द कलम /489 /अ 489 ब 489/क 489/ड 489 ई 420 34 प्रमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरील कारवाई हि उपविभागीय पोलिस  अधिकारी श्री वैजने साहेब दहशतवाद कक्ष हिंगोली यांच्या पथका मार्फत करण्यात आली आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे मो .8007689280

No comments:

Post a comment