तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची नुकसान भरपाई त्वरित द्या अन्यथा पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली आदोंलन करणार-राजेश गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी तालुक्यात गेल्या 20 दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने सोयाबीन,कापुस,मुग व इतर पिक होरपळुन गेले आहेत यामुळे  शेतकऱ्यांच्या जिवनात मोठे संकट निर्माण झाले आहे.शासन व पिक विमा कंपनीने त्वरित पंचनामे करुन पिकाचे नुकासान भरपाई म्हणुन 25 हजाराची थेट मदत करावी अन्यथा पंकजाताई मुंडे व खा.प्रितमताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार असल्याचा इशारा एका निवेदना द्वारे तहसीलदार यांच्या कडे भाजपा युवानेते राजेश गित्ते यांनी दिला आहे.
      तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2020 च्या खरिप हंगामात परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन,कापुस,मुग व इतरचा पेरा करण्यात आला.परंतु सुरुवाती पासुनच पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे गेल्या 20 दिवसा पासुन पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील कापुस सोयाबीनचे पिक पुर्णपणे करपुन गेली आहेत.सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे तेव्हा शासनाच्या कृषी कार्यालय,पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना परळी परिसरातील शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पंचानामे त्वरित करावे आणी नुकसान भरपाई म्हणुन त्वरित 25 हजारीची मदत करुन आर्थिक संकटात सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याला सहकार्य करावे अशी मागणीचे निवेदन बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर राजेश गित्ते यांच्यासह खोडवा सावरगावचे सरपंच अरूणभाऊ दहिफळे, माजी पंचायत समितीचे सदस्य मारोती फड, मांडवा गावचे सरपंच सुंदर मुंडे, नंदनज गावचे सरपंच अनिल गुट्टे, बालाजी गित्ते, मिरवट गावचे सरपंच धुराजी साबळे, मिरवट सेवा सहकारी सोसायटीचे भरत इंगळे, दशरथ गित्ते, विनायक डापकर, बालाजी गुट्टे, राम गित्ते, रामकिशन गित्ते, सोमनाथ गित्ते, माऊली आंधळे,  नरहरी डापकर व तालुक्यातील विविध गावचे सरपंच, शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत न दिल्यास राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितममुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी दिला आहे.

No comments:

Post a comment