तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

अंबाजोगाई येथील प्रसिद्ध वकील अँड.संतोष मुंडे यांना पितृशोक ; सन गाव येथे दुपारी 3.00 वा. अंत्यसंस्कार


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रसिद्ध वकील ऍड. संतोष मुंडे यांचे वडील लक्ष्मण सीताराम मुंडे  यांचे आज शनिवार दि.12 सप्टेंबर रोजी सकाळी 6.00 वा दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सन गाव येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. स्व.लक्ष्मण मुंडे हे अंबाजोगाई येथे सन.1989 साली पोस्टमास्तर म्हणून सेवेत होते. प्रदीर्घ काळ ते नौकरीत होते. पाटोदा ता.पाटोदा, अंबाजोगाई,परळी आणि इतर ठिकाणी त्यांनी पोस्ट मास्तर म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.त्यांचे आज शनिवार दि.12 सप्टेंबर रोजी सकाळी.6.00 वा.त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मूळगावी सनगाव ता. अंबाजोगाई येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी , 3 मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे. मृत्यू समयी ते 78 वर्षांचे होते. अत्यंत संयमी आणि मितभाषी म्हणून ते ओळखले जात होते. अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तील वकील अँड. संतोष मुंडे यांचे वडील होते.मुंडे परिवारावर कोसळलेल्या दुःखात  परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a comment