तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

पालम तालुक्यातील बनवस येथील 375 शेतकऱ्यांनी धोंड प्रकल्प उभारण्यासाठी केला विरोधआरूणा शर्मा
नांदेड जिल्ह्यातील धोंडे प्रकल्प मंजूर झाला आहे त्यात पालम तालुक्यातील बनवस येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जाणार असल्याबाबत शेतकऱ्यांना तोंडी स्वरूपात माहिती मिळतात या प्रकल्पाला विरोध म्हणून बनवस येतील शेतकऱ्यानी प्रहार जनशक्ती च्या माध्यमातून दिनाक 14 सप्टेंबर
रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निवेदन देऊन या होणार प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे पालम
तालुक्यातील बनवस येतील धोंडी प्रकल्पाअंतर्गत १६० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार या बाबतही उप
जिल्हाअधिकारी सुधिर पाटील गंगाखेड यांच्यामार्फत या शेतकऱ्याना तोंडी सांगण्यात आले आहे,परंतु संबंधीत प्रकल्पाच्या मंजुरीबाबत कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये अद्यापर्यंत जाहिर प्रगटन निघाले नाही,या बाबत शेतकऱ्यांच्या हरकती देखील मागवण्यात आलेल्या नाहीत,पुर्नतःअन्नभिन्न असलेले शेतकरी प्रशासनाच्या विविध पातळीवर संबंधीत प्रकल्पाची माहिती घेत असतांना त्यांना कुठल्याही प्रकारची लेखी माहिती  प्रशासनाकडून दिली जात नाही.अशा परिस्थितीमध्ये बनवस गावातील ३७५ शेतकरी कुटुंब प्रमुखांनी दि.14 रोजी परभणी प्रहार जनशक्तीचे पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलींग बोधने यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या शिष्ट मंडळासह जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा व अडचणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या समोर मांडल्या  याची तात्काळ दखल घेत मा . जिल्हाधिकारी यांनी पुढील आठवडयामध्ये संबंधीत प्रकल्पाचे अभियंते,पुनर्वसन अधिकारी,उपजिल्हाधिकारी गंगाखेड,प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व तक्रारकर्ते शेतकरी यांची तात्काळ बैठक लावण्यात आली आहे.यावेळी  शिवलिंग बोधने.गजानन चोपडे. चंद्रशेखर लांडगे,राहुल साळुंके,
मल्लीकार्जुन लांडगे,पांडुरंग लांडगे,शिवसांभ लांडगे,परबत लांडगे,शिवमुर्ती लांडगे,दिलीप लांडगे,गजानन शिंदे,रामेश्वर पुरी, दत्ता गरुड,अंकुश गिरी, माणिक कदम,संगमेश्वर लांडगे 
इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a comment