तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

पोषणमाह निमित्त 6 कुपोषित बालके घेतली दत्तक

प्रशासक प्रियंका गवळी यांचा सामाजिक उपक्रम

फुलचंद भगत/वाशिम
वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी अनसिंग  ग्रामपंचायत म्हणून गावाच्या प्रशासक या नात्याने आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे.आपल्या कुटूंबात कुणीही कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून, पोषण माहचे औचित्य साधून गावातील 6 कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सदृढ बनविण्याचा अभिनव उपक्रम वाशीमच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी तथा प्रशासक ग्रामपंचायत अनसिंग कु.प्रियंका गवळी यांनी हाती घेतला आहे. या बालकांचा शारीरिक विकास व्हावा याकरीता बालकांना पोषक अन्नधान्या सह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांच्या वतीने करण्यात आले.
               वाशीम जिल्ह्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या अनसिंग ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने याठिकाणी वाशीमच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांच्या कडे प्रभार देण्यात आला आहे.गावचा प्रशासक म्हणून आपली गावाच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असून आपल्या कुटुंबात कोणीही कुपोषित राहायला नको,या संकल्पनेतून त्यांनी पोषणमाहचे औचित्य साधत गावातील 6 कुपोषित बालके दत्तक घेतली आहेत.आजची बालके म्हणजे देशाचा उज्वल भविष्या असून ती सुदृढ व सशक्त असावी याकरीता शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच संकल्पनेतून सप्टेंबर महिना हा पोषणमाह म्हणून साजरा करण्यात येतो. वाशीम जिल्ह्यात यानिमित्त नागरिकांच्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच महिला,कोशोरवयीन मुले,स्तनदा माता यांना पोषणमूल्ये देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत.दत्तक घेण्यात आलेल्या बालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या निकोप शारीरिक वाढी करीता आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना आपण करणार असल्याचे प्रशासक प्रियंका गवळी यांनी यावेळी सांगितले.शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवे व्यतिरिक्त जाणिवेतून वैयक्तिक रित्या कुपोषणा विरुद्ध चालविलेल्या या मोहिमेचे कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835
      8459273206

No comments:

Post a comment