तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

राविकॉच्या तालुका उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर टेंगसे यांची निवड.

प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्याती रेणापुर येथील ज्ञानेश्वर टेंगसे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाथरी तालुका उपाध्यक्ष पदी निवडीेेचे पत्र तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी पं स सदस्य अजय थोरे यांच्या हस्ते मंगळवार १ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी भवन येथे दिले.

या पत्रात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहचून पक्ष वाढी साठी काम करत रहावे. या वेळी ज्ञानेश्वर टेंगसे यांचा राविकाँ तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील,पं स सदस्य अजय थोरे.ऋषिकेश टेंगसे,विकास लाटे,गोविंद पौळ,विशाल घुंबरे,भागवत घुंबरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी, न प गट नेते जुनेद खान दुर्रानी, जि प कृषी सभापती सौ मिराताई टेंगसे,दादासाहेब टेंगसे,तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे,कृऊबास सभापती अनिलराव नखाते,जि पच्या  माजी उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या सह राकाँ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर  टेंगसे यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a comment