तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

परळीत कोरोना रुग्णांची साखळी कायमचप्रशासन आणि नागरिक दोघांनाही सतर्क होण्याची गरज-चंदुलाल बियाणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना आजाराची सुरुवातीला असलेली दहशत आजही कायम असली तरी नागरिक आणि प्रशासन दोघेही आपापल्या स्तरावर सध्या चांगलेच बेफीकीर झाले असून कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना आजार रोखण्यासाठीच्या उपाय योजनांना नागरिकांकडून बगल दिली जात असून प्रशासन देखील जे चाललय ते गंभिर आहे, परंतू डोळेझाक करण्याशिवाय त्यांच्याही हाती आता काही उरलेले नाही अशी खंत बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा न.प. सदस्य तथा आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केली आहे. उद्या सगळ सुरळीत होईल अशा भ्रमात न राहता कोरोनाचा नागरिक आणि प्रशासनाने हातात हात घालून पुन्हा मुकाबला केलाच पाहीजे असे आवाहन बियाणी यांनी केले आहे.
ऑगस्ट महिन्यात प्रत्येक दिवशी 10 ते 20 या संख्येने परळी शहर व तालुक्याील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. सप्टेंबर महिन्यातही पहिले दोन दिवस वगळता पुन्हा रुग्णांच्या संख्येने 25 चा आकडा एकाच दिवशी पार केला आहे. कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि त्यातच लॉकडाऊनमध्ये आलेली शिथीलता यामुळे कोरोना आजाराची दहशत अजूनही कायम असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर या बाबत चक्क उदासिनता दिसून येत आहे. प्रशासनाकडूनही नियमांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे तपासले जात नाही, दंडात्मक कार्यवाहीची तरतुद असतांनाही प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने शहराच्या चौका-चौकात, सर्वच रस्त्यावर नागरिक बेफीकीरपणे फिरत आहेत. संचारबंदी सायंकाळी 6 वा. संपते. परंतु असे असले तरी सर्व काही अलबेल आहे असेच वातावरण शहरात दिसून येते. 
दरम्यान, परळी शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून प्रशासनाने पुन्हा एकदा सर्त होण्याची, सार्वजनिक नियमांची अंमलबजावणी होते किंवा नाही हे तपासण्याची गरज आहे. वाढत चाललेला आकडा हा खर्‍या अर्थाने काळजीचा विषय असून परळी शहरातील प्रत्येक गल्ली बोळात कोरोना रुग्ण सापडलेला आहे. आपल्या पावला पावलावर कोरोना रुग्ण असतांनाही नागरिक जिवावर उदार होऊन का फिरत असतील हा सुद्धा एक प्रश्न असल्याचे बियाणी यांनी म्हटले आहे. दरम्यान, नागरिक व प्रशासनाने आजाराचे गांभिर्य लक्षात घ्यावे, परळीला कोरोनामुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा सतर्क व्हावे, असेही आवाहन परळी न.प.सदस्य तथा आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

No comments:

Post a comment