तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

हत्ता नाईक येथील गोशाळेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोपाल गोवर्धन आदिवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या गोपाल गोशाळेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून गोशाळेचे अध्यक्ष आणि इतर सदस्य, संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आज निवेदनाद्वारे रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार सेनगाव तालुक्यातील  हत्ता नाईक येथील गोपाल गोशाळेत वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी पकडलेले १८ बैल ठेवले होते. याबाबत ज्या आरोपींकडून बैल पकडण्यात आले होते, त्या आरोपींच्या वतीने औंढा येथील न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४५७ नुसार बैल परत मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जानुसार न्यायालयाने आदेश करून सर्व १८ बैल अर्जदाराला  अटीशर्तींच्या आधारावर परत करण्याचे आदेश दिले होते. परंतु गोशाळा चालकाने अर्जदाराला बैल परत दिले नसल्याने शेवटी आता पोलिसांनी सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोशाळेचा चालक शिवाजी गडदे महाराज याच्यावर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी गोशाळा चालकासह इतर संचालक मंडळांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, गोशाळेची धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी रद्द करण्यात यावी, संस्थेला देण्यात आलेले लाखो रुपयांचे अनुदान परत घेण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे, राहुल पुंडगे, नितीन खिल्लारे, शफी कुरेशी, विनोद भालेराव,सुनील खंदारे, यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment