तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 September 2020

जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   
जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतराचे पालन करत वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. 
         काही महिन्यांपासून राज्यच नाहीतर देशभरात आपल्यावर आणि आपल्या सर्वच सण उत्सवांवर कोरोना (कोव्हीड-१९) आजाराचे सावट आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साधेपणा साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त  जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोरजी लोहिया, सचिव दत्ताआपा ईटके गुरुजी, संचालक डॉ. वंगे दादा, श्रीराम मुंडे ,प्राचार्य.इप्पर सर, प्रा.घुगे सर, भाजपाचे नेते राजेश गित्ते, रवि कांदे,गणेश होळंबे,डॉ. बलविर मुंडे ,सुरेश सातभाई, आणि बंडु कांबळे व अनेक मान्यवरांनी व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. विलास (बापु) मुंडे त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करुन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.  जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलास (बापु) मुंडे यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान माजी महाराष्ट्राच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रितमताई मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली भाजपा पक्ष संघठन मजबुत करण्यासाठी व आपल्या पक्षाच्या वतीने जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी या शुभेच्छांच्या बळावर आपण कटीबध्द राहुन आणखी उमेदिने सामाजिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे.  वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यकर्ते, हितचिंतक आणि आप्तेष्टांनी शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे विलास (बापु) मुंडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a comment