तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

काशीमठ सस्थांन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनदास मल्ल्या आणि सचिव मधुसूदन पै यांना महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन केले सन्मानित


(मुंबई प्रतिनिधी)
कोवीड १९-कोरोना संसर्ग या महाभयंकर आजाराच्या काळात  अनेक श्रमिकांना मुंबईतील  पश्चिम उपनगरातील दहिसर येथील श्री काशीमठ संस्थान वाराणसी मठाधिपती प.पू.सयंमीन्र्द तिर्थ स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद् सुधिंन्र्द तिर्थ स्वामीजी़ंच्या जन्म नक्षत्र दिनी ०९ एप्रिल २०२० पासून  श्री विठ्ठल रखुमाई मंदिर दहिसर पूर्व यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयं:सेवक संघ आणि मनन प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या मदत वाटप करण्यात आली. तसेच उत्तर मुंबईच्या उपनगरातील बोरिवली, कांदिवली आणि , दहिसर व ठाणे-पालघर जिल्ह्यातील वसई कामण  पर्यंतच्या सर्व विभागात कित्येक उपेक्षित वसाहतीतील गोरगरीबांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांची पोटापाण्यासाठी वणवण भटकावे लागणारी तडफड, या विदारक परिस्थितीत दहिसर पूर्व काशीमठ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनदास मल्ल्या, जनरल सेक्रेटरी मधुसूदन पै यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून लाखो लोकांना गेले पाच महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अन्नदान,जीवनावश्यक वस्तूंचें वितरण केले होते.तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका , मुंबई पोलीस आणि अत्यावश्यक सेवा धारकांना सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रपाळीच्या सेवकांना पोटभर जेवण देऊन अन्नछत्र प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते  दहिसर काशीमठ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनदास मल्ल्या आणि सचिव मधुसूदन पै यांचा राजभवनात समारंभपूर्वक कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
विशेषतः या मंदिर व्यवस्थापन समितीने या पूर्वीही स्वच्छता सफाई कामगार श्री.सखाराम भालेराव या कर्करोगाशी झु़ंजणाऱ्या सदव्यक्तीला आणि दहिसर मधील किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या महिला भगिनीला आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात दिला होता. सेवाभावी सामाजिक ऋणानुबंध जोपासणाऱ्या दहिसर पूर्व येथील श्री विठ्ठल रखुमाई काशीमठ मंदिरा समितीचा राज्यपाल महोदयां कडुन झालेल्या सम्मानार्थ जनतेने मोहनदास मल्ल्या आणि मधुसूदन पै यांना मनःपुर्वक अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a comment