तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

ग्रामीण भागातील बससेवा तात्काळ सुरू करा―जि.प. सदस्य प्रदीप भैया मुंडे

आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे केली मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे परंतु अद्याप परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा ठप्प आहे ती लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी अशी मागणी नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी परळी आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच नागापूर - बोधेगाव- मोहा  मार्गे जाणारी बस सुरू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

    आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या लॉकडाऊनमुळे बस सेवा राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत सुरु करण्यात आले आहे परंतु ग्रामीण भागात अद्यापही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या जिल्ह्याच्या ठिकाणी बस सेवा सुरू आहे त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत त्यांच्या येण्या-जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही .खाजगी वाहने सुद्धा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहे तसेच खाजगी वाहन धारक यांनी मोठ्या प्रमाणावर तिकीट दरवाढ केली आहे त्यामुळे गरीब लोकांनी कसे यायचे हा  प्रश्नच उभा राहिला आहे.

   सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील बससेवा सुरू होणे गरजेचे आहे कारण अनेक इमर्जन्सी सेवा जसे दवाखाना आजारपण  प्रेग्नेंसी व इतर सेवा यांच्यासाठी बस सेवा सुरू करणे तात्काळ गरजेचे आहे तसेच नागरिकांची होणारी हेळसांड त्वरित थांबून लवकरात लवकर ग्रामीण भागात बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी केली.

No comments:

Post a comment