तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

मुंग उळीद सोयाबिन कपाशी पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई म्हणुन शेतकऱ्यांना अनुदान द्या अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन भाजपाची मांगणी


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात मुंग उळीद सोयाबीन, कपाशी , नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट शासकीय अनुदान द्या अन्यथा लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला तालुक्यात  शेतकऱ्यांच्या जमीनी कोसळधार पावसाने खरडून गेल्या त्याला २ महिने उलटुनही शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही सतत सुरु असलेल्या पावसाने अतिवृष्टी झाली  मुंग उळीद , पिकांवर बेंडका रोग अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मुंग उळीद शेगांच न लागल्याने शेतक ऱ्यांनी मुंग उळीद उपटुन फेकले त्यामुळे शेतकरी आर्थिक डबघाईत आले त्यात सोयाबीनवर मदार होती परंतु  सोयाबीन उगवलेच नाही तर दुबार पेरणी केल्यानंतर शेंगा नगण्य लागल्या कपाशी वर अळीचा प्रादुर्भाव वातावरणाच्या बदलाने पातोन गळाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे मुंग उळीद सोयाबीन कपाशी पिकांचे पंचनामे करुन शासनाने मुंग उळीद सोयाबीन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा सह अनुदान द्यावे अन्यथा कोरोनाच्या काळातही लोकशाहि मार्गाने शेतक ऱ्यांचा तहसिल कार्यालय भव्य मोर्चा काढण्याचा इशारा भाजपाच्या वतीने शासनाला देण्यात आला याबाबतचे निवेदन तहसिलदार चव्हाण यांना देण्यात आले यावेळी भाजपा जि प उपाध्यक्ष जानराव देशमुख, युवा मोर्चा जि सरचिटणीस लोकेश राठी, ता अ गणेश दातीर , पांडुरंग हागे, अंबादास चव्हाण , सुधारक शेजोळे, राजु मुयांडे, उद्धवराव व्यवहारे, अविनाश धर्माळ, निरंजन इंगळे, पांडुरंग इंगळे ,हरिदास धुर्डे , रामदास गावंडे गजानन ठाकरे सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते

No comments:

Post a comment