तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

धनंजय मुंडेंचा मुंबईत जनता दरबार; असंख्य लोकांनी मांडल्या समस्या


फोनवरून, पत्र देऊन अनेक प्रश्न जागीच निकाली

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध - धनंजय मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) (दि. ०३) :- मंत्रिमंडळातील सदस्य थेट जनतेला व पक्ष कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी उपलब्ध व्हावेत या खा. शरद पवार यांच्या संकल्पनेनुसार काल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दुपारी दोन ते चार या वेळेत घेतलेल्या जनता दरबारास असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या प्रश्न व समस्या मांडल्या. 

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत नागरिकांच्या तसेच पक्ष कार्यकर्त्यांच्या बहुतांश समस्या जागच्या जागीच संबंधितांना फोन करून किंवा आवश्यक पत्र देऊन जागच्या जागीच मिटवले.

या जनता दरबारास राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी मधील घटक पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावत आपल्या समस्या मंत्री महोदयांपुढे मांडल्या.

दरम्यान जनता दरबार ही संकल्पना नागरिक ते थेट मंत्री असा संवाद घडवून नागरिकांच्या समस्यांना थेट मंत्र्यांच्या समोर वाचा फोडण्यासाठी उपयुक्त ठरत असून, आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार म्हणून कटिबद्ध आहोत. दर गुरुवारी मी ठरल्याप्रमाणे पुन्हा जनता दरबारास उपस्थित असेल, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a comment