तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

गेवराई तहसील कार्यालयासमोर गोरसेनेचे आमरण उपोषणसुभाष मुळे
--------------
गेवराई, दि. १४ _ बंजारा समाजातील विविध घटकांना एकत्र करून सामाजिक न्याय देण्यासाठी गोरसेनेने आता ठोस पावले उचलली आहेत. एका कुटुंबाला आधार देण्याऐवजी फरफट चालवली आहे, हे लक्षात येताच गोरसेनेच्या वतिने गेवराई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.
         गेवराई तालुक्यातील मारफळा ( राठोड तांडा )  ता. गेवराई येथील शेतकरी स्वर्गीय साहेबराव रूपा राठोड यांच्या शेतामध्ये पाइपलाइन चे काम सुरू असताना जेसीबी वाहन अंगावर गेल्या मुळे त्यांचा जागीच मुत्यू झाला. त्यांची जमीन मोजे सेलू या शिवरामध्ये आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले, घरातील कर्ता गेल्याने त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. कृषी खात्यामार्फत स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात योजने मार्फत कुटुंबाला फाईल दाखल करण्यासाठी ७/१२ लागत आहे. ऑनलाइन  करणाऱ्याच्या चुकीमुळे त्याचे नाव सातबाऱ्यावर साहेबा रूपा डोंगरे असे झाले आहे, त्यांचे फेरफार वर त्याचे खरे नाव साहेबराव रूपा राठोड हे आहे नाव दुरुस्तीसाठी मागील दोन महिन्यांपासून हे कुटुंब तलाठी कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. वारंवार विनंती करूनही शेलू सज्जा येथील तलाठी निकाळजे हे या कामास दिरंगाई करीत आहे. दोन महिन्यापासून तलाठी साहेबांनी या कुटूंबाला कार्यालयाच्या चकरा मारायला लावल्या आहेत म्हणून त्याची तक्रार  दिनांक ०४/०९/२०२० रोजी गोर सेना गेवराई तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय गेवराई येथे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. एक आठवडा लोटूनही तहसीलदार साहेबांनी या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. दिनाक ११/०९/२०२० रोजी तहसील कार्यालयात दि. १४/०९/२०२० रोजी आमरण उपोषणला बसणार असल्याची प्रत सादर करण्यात आली. 
         या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गोर सेना गेवराई तालुका प्रमुख सतिशभाऊ पवार, गोर सेना तालुका उपाध्यक्ष विजय राठोड, तालुका सचिव संजय राठोड, तालुका सहसचिव बाळराजे राठोड, तालुका संघटक अण्णासाहेब चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख अनिल राठोड, रामेश्र्वर राठोड व त्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या पत्नी कमलबाई साहेबराव राठोड, मुलगा मनोज राठोड, गोरखनाथ राठोड, कैलास आडे इत्यादी व्यक्तींनी तहसील कार्यालय गेवराई येथे ७/१२ वरील नाव त्वरित दुरुस्त करून मिळणे बाबतच्या कामात हलगर्जीपणा केल्याने तलाठी निकाळजे यांच्यावर कडक कार्यवाही करावी व सदरील मयताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment