तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

लहु क्रांती संघर्ष सेनाची हिंगोली व सेनगाव कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी केशव अवचारतर उपाध्यक्षपदी हनुमान सुतार यांची निवड करण्यात आली

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे  

लहू क्रांती संघर्ष सेनेचे महाराष्ट्र सह सचिव ज्ञानेश्वर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्हा व सेनगांव कार्यकारिणी जाहिर करण्यात आली  सेनगाव तालुक्यातील  लहु क्रांती संघर्ष सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली सेनगाव तालुका अध्यक्ष सचिन सुतार तर उपाध्यक्ष शिवराज कांबळे यांची निवड करण्यात आली लहु क्रांती संघर्ष संघटनेचे अध्यक्ष संस्थापक राजू कसबे यांच्या आदेशाने हिंगोली सेनगाव या दोन्ही ठिकाणी निवडी केल्या आहेत जिल्हाध्यक्ष केशव अवचार तालुकाध्यक्ष सचिन सुतार यांची निवड करण्यात आली यावेळी हिंगोलीचे नुतून जिल्हाध्यक्ष केशव अवचार यांनी संघटना  शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे  त्यांनी  समाजाला  एक दिशा  दिले आहे  आपण  सर्वजण या संघटने मध्ये  एकजुटीने  एका मोठ्या मनाने काम करूया  असे त्यांनी  सांगितले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये लहू क्रांती संघर्ष सेना एकजुटीने मोठी फळी उभी करायची आहे जिथे अन्याय होईल तिथे संघर्ष करण्याचे काम आम्ही करू असे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले आहे यावेळी महाराष्ट्र सहसचिव ज्ञानेश्वर कांबळे यांनी हिंगोली  जिल्हाध्यक्ष केशव अवचार यांचे हार व पुष्प देऊन संघटनेमध्ये स्वागत केले आहे तालुक्यातील सचिन सुतार यांची अध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीमुळे सेनगाव तालुक्यात व हिंगोली जिल्ह्यांमध्ये कौतुकाचे अभिनंदन वर्ष होत आहे संस्थापक अध्यक्ष राजू कसबे उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे सचिव किशोर गवारे सहसचिव ज्ञानेश्वर कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment