तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

भिमवाडी येथील लाईटची डीपी, पोलवरील तारा तात्काळ दुरुस्त करा :- सचिन रोडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- शहरातील जुने रेल्वे स्टेशन भिमवाडी सरस्वती विद्यालया जवळी डीपी मधील किट कॅट उघडणे डीपीला नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवा सोबत कुठलीही दुर्घटना होऊ नाही म्हणून  जुने रेल्वे स्टेशन भिमवाडी येथील लाईटची डीपी आणि पोलवरील तारा तात्काळ दुरुस्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन रोडे यांनी केली आहे.


 जुने रेल्वे स्टेशन भिमवाडी सरस्वती विद्यालया जवळील डीपीत बऱ्याचदा शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या उडतात त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच याच भागातील लाईटचे पोल कुजलेले असून त्यावरील तारा लोंबकळत असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात वारा पावसामुळे केव्हाही तुटून पडून फार मोठी हानी होऊ शकते. या  हानीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी महावितरण प्रशासनाने आता ठोस पावले उचलायला हवीत अशी मागणी महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता परळी वितरण विभाग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सचिन रोडे यांनी  केली आहे. 


शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीतच शहरातील  विभागातील लाईटच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या भागातील डीपीला व्यवस्थित दरवाजे बसवण्यात यावे लोंबत असलेल्या जुन्या तारा काढून नवीन टाकण्यात याव्यात या मागण्या पूर्ण न झाल्यास परळी महावितरण विभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा  निवेदनातून सचिन रोडेनी  दिला आहे.

No comments:

Post a comment