तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच आयोजित, राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य मैफिल रंगली


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ आयोजित, राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य मैफिल अतिशय सुंदर रंगली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला हा पहिलाच कार्यक्रम. दिवसभरात पाच सत्रात झालेल्या या सुरेल कार्यक्रमात जवळपास शंभर शिक्षक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

सकाळी ११वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष नटराज मोरे यांनी तुळशी रोपाला पाणी देऊन केले.  शिक्षक शाळेत मुलांना सर्व विषय आणि कला, क्रीडा शिकवीत असताना स्वतः अनेक कलांपासून दूर रहात असतात. त्यांना साहित्य व कला मंच मिळवून देणे हा संस्थेचा मूळ उद्देश आहे, शिक्षकांना जिल्हा, राज्य याबरोबरच देशाचेही कला व क्रीडा क्षेत्रात  प्रतिनिधित्व करता यावे  यासाठी निर्माण केलेल्या  या मंडळामार्फत स्वप्न साकार होत आहे, असे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे यांनी सांगून कार्यक्रमासाठी सर्व कवींना शुभेच्छा दिल्या.
डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. १९९७ साली नटराज मोरे यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत आहे या मंडळामार्फत राज्यस्तरीय मासीक स्पर्धा, राज्य व जिल्हास्तरीय संमेलन, चर्चासत्र परिसंवाद, काव्य संमेलन, साहित्य व कला प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम घेतली जातात. मंडळाच्या राज्यात सर्व जिल्ह्यात शाखा असून लवकरच कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश यासह इतर राज्यातही विस्तार होणार आहे. असे आपल्या मनोगतातून त्यांनी सांगितले.

सकाळी साडे अकरा वाजेपासून काव्यसंमेलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रत्येक सत्राचे सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणे वेगवेगळे होते. 
समुह प्रशासन व राज्याध्यक्ष नटराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. हर्षल साबळे यांनी दिवसभर संमेलन संयोजनाची भूमिका अत्यंत चोख पार पाडली. स्पर्धा प्रमुख प्रकाश साखरे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर रेखीव नियोजन केले. प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे यांनी सुरुवाती पासून दक्षतेने आपले काम केले. अलंकार वारघडे यांनी राज्य तंत्र निरीक्षकाची भूमिका यशस्वीपणे पेलली. कार्यक्रम दर्जेदार झाला. आजच्या कार्यक्रम यशस्वीतेचे श्रेय या उत्साही सदस्यांच्या चौकटीत दडले आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रमाचा आवाका खूप मोठा होता. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपली जबाबदारी ओळखून काम पूर्ण केले. आपल्या जिल्ह्यातील कवी शिक्षकांना या प्रवाहात आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सर्व जिल्हाध्यक्षांनी केल्याची बाब प्रशंसनीय आहे.
विजय जोगमार्गे, राज्य सचिव, कोकण विभागीय अध्यक्ष प्राचार्य संतोष लुले, राज्य उपाध्यक्ष सौ. शालिनी मेखा, संपत गर्जे, पुणे, संभाजी पोळ, पालघर, राजेश मोहिते, नासिक, रमेश मुनेश्रर, नांदेड आणि राज्यातील  जिल्हाध्यक्ष मिताली तांबे, मुंबई उपनगर, शिवाजी जगताप, बीड, अमित आदवडे, रत्नागिरी यांच्यासह अनेकांचे अतुल्य हातभार लागले. उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम खूपच चांगला झाला आणि शिक्षकांना पुढे येण्याची संधी मिळाली अशा प्रतिक्रिया सहभागी कवींनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन समिती प्रमुख हर्षद साबळे यांच्यासह जया नेरे, नंदुरबार, सुचित्रा सोनार, ठाणे, अर्चना मोरे ठाणे, रेखा पाटील, कोल्हापूर, छाया शिंदे व मोहिनी बागुल, अंबरनाथ, सुरेखा कुंभार, कोल्हापूर, मनिषा रायजादे-पाटील व सुषमा डांगे, सांगली यांनी प्रत्येक सत्राचे अतिशय सुरेख सूत्रसंचलन करून काव्य मैफिल सजवली. आपल्या शाब्दिक प्रतिभेचे रंग भरले. प्रत्येक सत्रासाठी राज्यातील राज्य समिती सदस्य व जिल्हाध्यक्ष हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
उत्कृष्ट झालेल्या प्रत्येक सत्राचे सुयोग्य आभार हर्षल साबळे, गणेश लेंगरे जिल्हाध्यक्ष सोलापूर, नंदकुमार डंबाळे जिल्हाध्यक्ष जालना, ज्ञानेश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष सातारा, किशोर चलाख जिल्हाध्यक्ष गडचिरोली, मिलिंद इंगळे जिल्हाध्यक्ष अकोला यांनी मानले.
    अीुत बहारदार काव्यसंमेलन 
 प्रत्येक कवीसाठी आणि श्रोत्यांसाठी पर्वणी होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून काव्य मैफिलीसाठी कविता सादर करणाऱ्या कवींसह रसिक श्रोते ऑनलाईन उपस्थित होते. उपस्थितांचे ठाणे जिल्हाध्यक्ष हर्षल साबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a comment