तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथ भेट

सोनपेठ :  (तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी)
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ वनिता कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत सातपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी प्रा.डाॅ.वनिता कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथ भेट दिली
शहरातील काही रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देण्याची परंपरा आहे, याचाच एक भाग म्हणून याप्रसंगी प्रा. डॉ.वनिता कुलकर्णी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास हिंदी विषयाचे संदर्भ ग्रंथ भेट म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अनंत  सरकाळे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी महाविद्यालयातील डॉ.कच्छवे एम.डी. डॉ.अंबादास बर्वे, डॉ.शिवाजी अंभुरे, डॉ.बापुराव आंधळं, डॉ.अशोक चव्हाण, डॉ.मुकुंदराज पाटील, डॉ.संतोष रणखांब, डॉ. गोविंद वाकनकर, प्रा.विकास रागोले, भागवतराव हाके, संतुक परळकर,दता सोनटक्के, उपस्थित होते

No comments:

Post a comment