तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

सोयाबीन, मुंग, उळीद, तुर पिक नुकसान भरपाई द्या व पिकविमा मंजुर करा राष्ट्रवादी कॉग्रेसची मांगणी


संग्रामपुर[ प्रतिनिधी] तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन , उडीद , मुंग व तूर  खरीप पीकांचे नुकसान झाल्याने शासनाने महसुल विभागा करवी सर्वे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी व  विमा सन 2020 मंजूर करण्यात यावा अशी मांगणी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने तहसिलदार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे  संग्रामपुर तालुका मध्ये गेले काही दिवसा पासून झालेल्या सततच्या पाऊस अतिवृष्टीमुळे, शेती क्षेत्र जलमय झाले तसेच त्या मुळे उतभवलेल्या रोग्याच्या व्यापक प्रादुर्भाव या मुळे मुग , उडीद व सोयाबीन या पिकांची अवास्तव वाढ झाल्या मुळे शेंगा व फुले लागलेल्या नाही व सोयाणीन पिकाला फक्त पाने शिल्लक राहिलेली आहेत . प्रतिकूल परिस्थितीत हवामानात होणाऱ्या बदलामुळे ( एलोमोजाक) सोयाबीन पिकावर येण्यास सुरवात झालेली आहे त्यामुळे संपूर्ण पीक शेतकऱ्याच्या हातून गेले आहे . शासणाने महसुल विभागा करवी सर्वे करून पंचनामे करण्यात यावे व शेतक ऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी व ह्या पिकांचा खरीप पीक विमा सन 2020 मंजूर करण्यात यावा अशी मांगणी एका निवेदनाव्दारे रॉ कॉग्रेस तालुकाध्यक्ष नारायण ढगे, युवा ता अ पंकज ठाकरे , संजय गावंडे, दुर्गासिंग सोळंके , बाळु साबे, राजेश आमटे, अजय सोनी, राजेश गिरी, शिवाजी भिसे, आदी राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केली

No comments:

Post a comment