तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

रविवार दि.१३ रोजी परळी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय - माऊली फडपरळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- दि.११ - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता परळी व्यापारी महासंघ पुढे सरसावला आहे.विविध व्यापारी महासंघाच्या आज छोटाखानी झालेल्या बैठकीत येत्या रविवारी म्हणजेच दि.१३ रोजी शहरातील मेडीकल दुकाने वगळता सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

परळीतील व्यापारी महासंघाच्या वतीने रविवार दि.१३ रोजी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.हा बंद फक्त एकच दिवस असून शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापले दुकाने बंद ठेवावेत असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड यांच्या वतीने करण्यात आले आहे.एक दिवस पूर्ण व्यापार बंद ठेवल्याने कोरोनाची साखळी काही प्रमाणात तोडण्यात व्यापाऱ्यांकडून प्रशासनाला सहकार्य होईल असेही ते म्हणाले आहेत. यावेळी या.बैठकीस अध्यक्ष माऊली फड, सचिव नंदुसेठ बियाणी, सदस्य बंडू गरूड, संदिप सेठ लोहोटी, रिखभचंद कांकरिया, शंकर आडेपवार व सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a comment