तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 September 2020

वैजापूर तालुक्यात वादळी वारा व पाऊसाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान...गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

सतत अवर्षणग्रस्त असणाऱ्या वैजापूर तालुक्यात यंदा वरुण राजाने जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार बॅटिंग केल्याने पावसाने तीन महिन्यातच वार्षिक सरासरी गाठली. यामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसंचय झाला आहे.

 वैजापूर शहरासह तालुक्यात 2 दिवसापासून झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने तालुक्यात बहुतेक ठिकाणी ऊस,कपाशी,तुर,बाजरी,मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यात सर्वात जास्त फटका महालगांव,चोरवाघलगांव,भगुर, एकोडीसागज, सिरसगांव,हनुमंतगाव,म्हस्की,सावखेडगंगा आदी गांवाना बसला आहे.

No comments:

Post a comment