तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

स्व नितिन महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा.


प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितीन कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या मार्गदर्शनात सोमवार १४ सप्टेबर रोजी सोशल डिस्टंसिंगचे नियम  पाळत हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ साहेब राठोड हे होते तर प्रमुख तर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सुंदर गजमल हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा डॉ जगन्नाथ बोचरे, ग्रंथपाल कल्यान यादव,हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ मारोती खेडेकर,प्रा डॉ संजयसिंग ठाकूर यांची उपस्थिती होती. या वेळी प्रा डॉ गजमल म्हणाले की हिंदी भाषा अनेकते तून एकता निर्माण करणारी सुत्रधार आहे.या वेळी प्रा खेडेकर,प्रा राठोड यांनी मनोगते व्यक्त केली.महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु घांडगे यांनी केले तर आभार पद्मजा नांदेडकर यांनी मानले.

No comments:

Post a comment