तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

अभिजित राणे युथ फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर...

अभिजीत राणे युथ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात विश्वनाथ पंडित-चिपळूण यांच्या पत्राला प्रथम क्रमांक मिळाला असून,दत्ता खंदारे धारावी यांच्या पत्राला द्वितीय क्रमांक तर प्रिया मेश्राम-नागपूर या तिसऱ्या आल्या आहेत, तर सिराज शेख-बीड चतुर्थ, सुधीर कनगुटकर-दिवा पंचम, दत्तप्रसाद शिरोडकर मुलुंड-सहावा, सुभाष अभंग ठाणे-सातवा, यशवंत चव्हाण बेलापूर-आठवा, गणेश लेंगरे सोलापूर-नववा व किरण धुमाळ-अकलूज दहावा क्रमांक प्राप्त केले असून जनार्दन नाईक, शांताराम वाघ, रोहित रोगे, संगीता जांभळे व अनुज केसरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच महेश्वर तेटांबे, निसार अली, शांताराम गुडेकर, सुरेश पोटे, कैलास रांगणेकर, आकाश पोकळे, पंकजकुमार पाटील, लक्ष्मण राजे, रफिक घाची, गणेश हिरवे, उदय सांगळे, निलेश धुरी, श्याम ठाणेदार, वैभव पाटील, गुरुनाथ तिरपनकर, शशिकांत सावंत यांना पत्रकारितेच्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे युथ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित राणे यांनी सांगितले व विजेत्यांना लवकरच आमच्या धडक कामगार युनियनच्या गोरेगाव स्थित कार्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धाप्रमुख गणेश हिरवे यांनी दिली.

No comments:

Post a comment