तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 September 2020

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश


 (मुंबई प्रतिनिधी)
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर , ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर , माया जाधव , लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रियदर्शन जाधव, कौस्तुभ सावरकर, संगीत दिग्दर्शक संतोष भांगरे , अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे , निर्माता श्याम राऊत, डॉ.सुधीर निकम,उमेश बोळके , मोहित नारायणगावकर आणि सह कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार , मा.खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील उपस्थितीत होते.
अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केल्यावर अभिनेते विजय पाटकर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.तसेच नियामक मंडळाच्या सदस्या अभिनेत्री सविता मालपेकर यांची राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या हस्ते अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आणि सर्व कलाकारांना राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व नाट्य सिनेकलावंतानी अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a comment