तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

धोबी समाज आरक्षण प्रस्ताव प्रक्रिया अंतिम टप्प्यात-मंत्री ना.धनंजय मुंडे यांची माहिती

==================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून विहित नमुन्यात दुरूस्तीसह केंद्रीय सामाजिक न्याय विभागाला पाठवायचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षणाची तपशीलवार माहिती मिळाल्यावर रकाना भरून अहवाल पाठवण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाला दिला असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी सोमवार,दिनांक 31 ऑगस्ट रोजी अंबाजोगाईत दिली.


महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने समाजाच्या आरक्षण प्रश्नी तत्काळ उपाययोजना व्हावी अशी सातत्याने मागणी होत होती.गेल्या आठवड्यात २४ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर संघटनेने काळे निवेदन देत अनोखे निषेध आंदोलन केले होते.त्याची दखल घेत मंत्री ना.धंनजय मुंडे यांनी समाजाच्या प्रातिनिधिक शिष्टमंडळाची अंबाजोगाई (जि.बीड) येथील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली होती.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत धोबी समाजाच्या आरक्षणाबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेचा ऊहापोह यावेळी करण्यात आला.बैठकीत मंत्री ना.मुंडे यांनी धोबी समाज आरक्षण प्रस्तावातील अडचणी सांगून यावेळी परिपूर्ण व बिनचूक अहवाल पाठवला जाईल,त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे पदाधिका-यांसमोर नमूद करत महाविकास आघाडी सरकार धोबी समाजासह इतर सर्व छोट्या जातींना निश्चित मदतीची भावना ठेवून काम करीत असल्याचे स्पष्ट केले.मंत्री ना.मुंडे यांच्या सोबत आयोजित बैठकीला महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष गणेश जगताप,प्रदेश कोषाध्यक्ष गोपीअण्णा चाकर,राज्य उपाध्यक्ष सर्जेराव भागवत,राज्य संघटक विलासराव जाधव,मराठवाडा विभागीय अध्यक्ष शंकर बनसोडे,विभागीय युवक अध्यक्ष अॅड.सुधीर जाधव,युवक जिल्हाध्यक्ष सचिन जाधव,शहराध्यक्ष अर्जुन जाधव,जिल्हा उपाध्यक्ष उत्तरेश्वर सोळंके,पञकार अशोक दळवे,मंगेश घोडके,प्रवीण साळुंखे,रवींद्र जाधव,योगेश जाधव,शशिकांत दळवे,गगन कांबळे,प्रशांत मानकर,सोनू बुंदेले,गोविंद जाधव,शशिकांत दळवे,नितीन जाधव,सचिन काशिद आदी उपस्थित होते.शिष्टमंडळ बैठक आयोजनासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विशेष सहकार्य तर राज्य संघटक विलासराव जाधव यांनी पाठपुरावा केला.

=================
नोट-बातमी सोबत फोटो.
==================

No comments:

Post a comment