तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

राजकन्या पिसाळ यांचे निधन


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ५_ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व महाबली जिनिंगचे मालक मनोहर पिसाळ यांच्या सौभाग्यवती राजकन्या पिसाळ ( वय ५५ वर्ष ) यांचे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेसात वाजता औरंगाबाद याठिकाणी उपचार दरम्यान निधन झाले. 
             याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बीड तालुक्यात एका गावात अंत्यविधीसाठी राजकन्या मनोहर पिसाळ ह्या गेल्या होत्या. त्यांना घशात अचानक त्रास होऊ लागल्याने बीड येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती साथ देत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औरंगाबाद येथील सिग्मा, हेडगेवार यांसह इतर एका हाॅस्पिटलने बेड शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. दरम्यान जे जे प्लस हॉस्पिटल औरंगाबाद याठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत कसलीही सुधारणा झाली नसल्याने उलट ह्रदयविकाराचा तिव्र झटका आल्याने प्राणज्योत मालवली. घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गेवराई शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. व्यापारी बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून पिसाळ परिवारातील दुःखात सहभागी झाले.
       त्यांच्या पश्चात पति, मुलगा, मुलगी, सुन, नात तसेच मोठा पिसाळ परिवार आहे. या परिवारावर कोसळलेल्या दुखा:त परिसरातील नागरिक व आप्तेष्ट सहभागी झाले होते.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment