तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मदत करण्याची केली मागणी


अरुणा शर्मा


पालम :- व पूर्णा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची प्रशासनाकडून तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक्करी 50  हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली.
  परभणी जिल्हाभरात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वादळी वारे झाले, या वाऱ्यामुळे पालम व पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्याच्या  कापूस व उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना यावर्षी बोगस सोयाबीन बियाणे, खत टंचाई आणि पीक कर्ज वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकरी हैराण झालेला असताना हे अस्मानी संकट ओढवलय, त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने एकरी 50 हजार रुपये  नुकसान भरपाई द्यावी कारण कापूस व ऊस या दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. कर्ज काढून ही पिके जोपासलेली असताना या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. या बाबत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासनाला निवेदन दिले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर रासप जिल्हा अध्यक्ष अँड संदीप अळनुरे, पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, रासपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे, बाळासाहेब कराळे, पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश दुधाटे, रासपा तालुका अध्यक्ष गजानन माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a comment