तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

सर्व व्यापारी वर्गा कडुन डोणगाव सात दिवस बंदची हाक!


डोणगांव :- ७. जमील पठाण 

 डोणगाव  येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व व्यापारी असोसिएशनच्या  वतीने डोणगाव  सात दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्माण घेण्यात आला आहे.
डोणगाव येथे  आज दिनांक ७ सप्टेंबर रोज सोमवार ला स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये कोवीड समन्वय समितीची बैठक घेण्यात आली गेल्या मागील दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून आज पर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे. परंतु तरीही बाजारात, बसस्थानक परिसर, भाजीमंडी परीसरात गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांकडून कोणतेच फिजीकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. तर नागरिकांकडून मास्क वापरल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामुहिक संसर्ग होण्याची भीती वाटत आहे. डोणगाव हॉटस्पॉट होण्यापूर्वी कोरोनाची साखळी तोडण्यात यावी या साठी मान्यवरानी आपले मत मांडले या मध्ये सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीने डोणगाव दिनांक ९ सप्टेंबर पासून दिवस ७ सामुहिक रित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे सभापती राजेंद्र पळसकर. पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव. ठाणेदार दिपक पवार. वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल गवई. डॉ. बिबे. मंडळ अधिकारी शिवप्रसाद म्हस्के. ग्रामपंचायत सचिव चनखोरे. उपसरपंच जुबेरखान. माजी सरपंच संजु पाटील आखाडे. डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर. संदिप पांडव. अबरार मिल्ली मनोज जयस्वाल तसेच व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हामीद भाई मुल्लाजी यानी केले

No comments:

Post a comment