तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

जायकवाडी धरणात ९६ टक्के पाणीसाठा;कोणत्याही क्षणी कालव्याव्दारे नदी पात्रात पाणी सोडणार.


प्रतिनिधी
पैठण:- महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या मातीचे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात गुरुवारी (ता.३) रोजी सकाळी सहा वाजता धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९५.८७ टक्के इतकी झालेली असून १२ हजार ४४३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग धरणामध्ये दाखल होत आहे. तेव्हा धरणाची टक्केवारी व धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची कारवाई करण्यात येईल. त्या अनुषंगाने गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्क राहावे व कुणीही नदी पात्रात जाऊ नये. नदी पात्रात असलेली चल अचल मालमत्ता त्वरीत काढून घेण्यात यावी असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment