तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

शिक्षकदिनी कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांचे काळ्याफिती लावून आंदोलन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
               कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक दिनी शासनाकडील प्रलंबित मागण्या मान्य न केल्याने काळ्याफिती लावून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. व आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांना देण्यात आले.
                  कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक दिनी शनिवारी (ता.०५) संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करुन काळादिवस पाळण्यात आला. येथील तहसील कार्यालयासमोर शारीरिक नियमांचे पालन करुन कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या येथील शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शासनाच्या वतीने दरवेळी आंदोलन केल्यास फक्त आश्वासन दिले जात आहे. कँबीनेट मिटींगमध्ये व अधिवेशनात विषय मांडून शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात येतील असे सांगितले जाते. पण शासन काही निर्णय घेत नाही. गेल्या२० वर्षांपासून विनाअनुदानित तुकड्यावर शिक्षक काम करत आहेत. आजपर्यंतच्या शासनाने लवकरच अनुदान देवू व पगार सुरू करु असे सांगण्यात आले आहे पण त्यांचेही पगार सुरु झाले नाहीत. तसेच जुनी पेंशन योजना आदी मागण्या शासनाकडे पेंडींग आहेत. या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात यासाठी शिक्षक दिनी काळ्याफिती लावून आंदोलन करण्यात आले. व मागण्यांचे निवेदन येथील तहसील कार्यालयात नायब तहसिलदार श्री.रुपनर यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील लोमटे, प्रा. एस.एम.सुर्यवंशी, प्रा. कोकलगावे, प्रा.बिराजदार, प्रा.सोळंके, प्रा. इथापे,  प्रा.फुटके, प्रा.कांबळे, प्रा. देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment