तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करा


परळीत संभाजी ब्रिगेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन

परळी,(प्रतिनिधी):- मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी आज दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वा. परळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, तसेच अन्य कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा आरक्षण दरम्यान अंतिम निर्णयासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटना पिकाकडे पाठवत असताना सद्यस्थितीत SEBC अंतर्गत असलेले मराठा आरक्षण स्थगित केली आहे. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे.
 तरी मा. राज्य शासनाने आपल्या  कार्यकक्षेत SEBC अंतर्गत आरक्षण पूर्वत करून मराठा समाजाला न्याय द्यावा, त्याचबरोबर याबाबत सलग्न पुढील प्रमाणे मागण्या करत आहोत.
१)राज्य मागासवर्ग आयोगाच्या (मा .न्यायमूर्ती गायकवाड आयोग) शिफारशी स्वीकारून त्याआधारे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा व सद्यस्थितीत ओबीसीमध्ये ज्या ज्या प्रमाणे वेगवेगळे आरक्षण आहेत. उदा.NT.A,BC,C,V.J.SBC तशीच एक वेगळी सब कॅटेगरी तयार करून मराठा आरक्षण देण्यात यावे
२) नचीअप्पन आयोगाच्या शिफारशी व करून त्या लागू कराव्यात व तसा केंद्र सरकारने कायदा करावा यासाठी प्रयत्न करावेत अशी केंद्राकडे शिफारस करावी.
३) चालू 2020 _2021 या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे.
४)येत्या काळात मराठा आरक्षण (SEBC) नसलेली कोणतीही नोकरी भरती करण्यात येऊ नये.
५)मराठा क्रांती मोर्चा वेळी मान्य केली प्रमाणे तालुका जिल्हा विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी तातडीने वसतिगृह सुरू करावे.
६) SEBC तसेच इतर योजना अंतर्गत बाकी असलेली फी व स्कॉलरशिपची शुल्क तात्काळ अदा करण्यात यावी .शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवून हा भार शासनाने स्वीकारावा.
वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा यापुढे संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

 या प्रसंगी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भास्कर निर्मळ, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष ईश्वर जीजा सोनवणे, संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष संभाजी आमले,  मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष हनुमान इंगळे, संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष  प्रदुम्न सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष  राम किर्दंत, तालुका संघटक हनुमान दिवटे, तालुका सचिव पुंडलिक लोणकर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष बाबा इंगळे, नामदेव- तुकाराम वारकरी परिषदेचे तालुका अध्यक्ष धनंजय महाराज सोळंके, तसेच बाबा सोनवणे, अॅड.विनोद सटाले, बालाजी इंगळे, ईश्वर झिरपे, कृष्णा पवार, सोमेश्वर बोडके, भाऊसाहेब नरवाडे, माणिक इंगळे, वैभव इंगळे, ऋषिकेश इंगळे, प्रदीप गीते यासह अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

फोटो कॅस्पियन:- 
संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक व तहसीलदार बिपीन पाटील यांना मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a comment