तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

कामगार नेते,धडक कामगार युनियनचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ संपादक अभिजीत राणे व लोकप्रिय स्थानिक नगरसेविका रेखाताई रामवंशी यांच्या हस्ते आरे वसाहतीतील आधार केंद्राचे उद्घाटन


गोरेगाव पुर्वेकडील आरे वसाहत येथील युनिट क्रमांक २ बंबखाना याठिकाणी प्रसिद्ध कामगार नेते धडक कामगार युनियनचे सर्वेसर्वा,ज्येष्ठ संपादक अभिजीत राणे व स्थानिक नगरसेविका रेखाताई रामवंशी यांच्या हस्ते आधार उद्योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रदीर्घ मेहनत घेऊन उद्योग आधार केंद्र सुरू करणारे संदीप सावंत,निलेश नाईक,सुरेश सुब्रमण्यम , संदीप महादे,कुप्पा स्वामी,विलास, सुद्रीक, प्रशांत, अजय खैरे, राजू पाटील, राजू बळी,सूरज गुप्ता,धनेश व त्यांचे सहकारी , तसेच जनआधार टाइम्सचे संपादक निलेश हरिश्‍चंद्र धुरी व आपला समाज मार्गदर्शकचे संपादक उदय सदाशिव सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी
कामगार नेते माननीय अभिजीत राणे यांनी संदीप सावंत यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच अभिजीत राणे यांनी स्थानिक नगरसेविका रेखाताई रामवंशी यांच्याशी आरे दुग्ध वसाहतीतील समस्यांबाबत चर्चा केली आणि या समस्यांमधून आरे वासियांची सुटका करण्याचे आश्वासन रेखाताईनी दिले.या वेळी शिवसेनेच्या लोकप्रिय नगरसेविका रेखाताई रामवंशी यांनी अभिजीत राणे यांचे आशीर्वाद घेतले. व या पुढे देखील अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरे वसाहत येथील अनेक समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मनोगत व्यक्त केले .

No comments:

Post a comment