तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

कामगार नेते अभिजित राणे यांच्या तर्फे अन्नधान्य मदत वाटप


(मुंबई प्रतिनिधी)
विख्यात कामगार नेते,जेष्ठ संपादक , धडक कामगार  युनियनचे संस्थापक , महासचिव अभिजीत राणे यांच्यावतीने नुकतेच जवळपास शंभर गोर गरीब व वंचित कुटुंबाना किराणा सामान अन्नधान्य किट ( गहू,तांदूळ,डाळ,साखर,तेल, पोहे,रवा मास्क व सॅनिटायझर ) मदत वाटप करण्यात आले. लॉक डाऊन सुरू झाल्यापासुन ते आतापर्यंत धडक कामगार युनियनच्या माध्यमातून हजारो वंचित कुटुंबियांना विविध प्रकारे मदत करण्यात आलेली आहे. तसेच नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवात गणपती विसर्जनासाठी मुंबईत युनियनच्या वतीने शंभर ऑटोरिक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.तसेच विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजन करण्यात आल्या होत्या. दरवर्षी अनेक समाजपयोगी उपक्रम धडक संघटनेच्या , दैनिक मुंबई मित्र व दैनिक वृत्तमित्र वास्त मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. असे अभिजित राणे यांनी यावेळी सांगितले.किराणा वाटप करण्यासाठी युनियनचे कौन्सिल मेंबर गणेश हिरवे यांनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a comment