तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

तुकोबाराया यांच्या पवित्र नावाने तुकाराम बिडी हे नाव तातडीने हटावा राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद तर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन.


हिंगोली -प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

-संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय आणि यांच्या पवित्र नावाने सुरू केलेले "संत तुकाराम बीडी"या उत्पादना वरील "संत तुकाराम" हे नाव तातडीने टाकावे या करिता राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद हिंगोली यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून वारकरी संप्रदायाची अस्मिता, कळसस्थान, किंबहूना महाराष्ट्राचे आराध्य स्थान असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाने बीडी उत्पादन करण्याचे दुष्कृत्य आंध्रप्रदेश राज्यातील निजामाबाद येथे चालू आहे. त्यामुळे देशातील समस्त देशवासीयांच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत.
          समाजातील अपप्रवृत्ती व व्यसन यांना आळा बसावा म्हणून संपूर्ण आयुष्य ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जगाला उपदेश केला...

"सेवी भांग आफू तंबाखू ऊदंड !
 परी तो भ्रांतीमाजी अखंड !!
तुका म्हणे ऐसा सर्वस्व बुडाला !
त्यासी अंतरला पांडुरंग !!"

अशा परखड शब्दात व्यसन प्रवृत्तींचा निषेध करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या नावाने "संत तुकाराम बीडी"हे उत्पादन चालू केले आहे त्यामुळे वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी हे संताप व्यक्त करीत आहेत सदर उत्पादकाने संपूर्ण वारकरीच नाही तर देशातील व विशेषत:महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या भावनांचा घोर अपमान केला आहे.
       आपल्याला या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की तातडीने आपण प्रशासकीय पातळीवर या उत्पादन निर्मितीवरील "संत तुकाराम बीडी" हे नाव काढून टाकण्यासाठी उत्पादक मालकास व उत्पादक कंपनी यांना आदेश द्यावेत व आतापर्यंत विक्री केलेला माल ताब्यात घ्यावा अशी विनंती राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद जिल्हाध्यक्ष हभप बाळकृष्ण महाराज गडदे, तालुकाध्यक्ष धर्मयोद्धे हभप गणेश महाराज कुबडे, तालुका उपाध्यक्ष हभप ओम महाराज निळकंठे, तालुका संघटक परमानंद महाराज काळे, हभप विजय महाराज चव्हाण, हभप उद्धव महाराज वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो नंबर व्हट्सप्प नंबर 8007689280

No comments:

Post a comment