तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

सेनगाव गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीचमागणी सामाजिक कार्यकर्त्यांचे दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


हिंगोली/प्रतिनिधी
 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. बेले यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी हिंगोली येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या सेनगाव तालुक्यात जैविक बोर्ड नागपुर महाराष्ट्र मंडळाकडून हिंगोली जिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद यांच्याकडे तसेच जिल्हा परिषदेकडून सेनगाव गटविकास अधिकाऱ्यांकडे जैवविविधता नोंदवही चे कामे सोपविण्यात आली होती. परंतु सदरील कामे सेनगाव गटविकास अधिकारी श्री बेले यांनी आपल्या मर्जीतील दोन संस्थांना परस्पर देऊन टाकली एवढेच नाही.  तर 3 सप्टेंबर रोजी सदरील कामे ग्रामपंचायतींवर सोडून ग्रामसेवकांच्या मासिक बैठकीत या संस्थांची धावपळ होऊ नये म्हणून एकाच छताखाली सर्व ग्रामसेवकांचे उपस्थित जैविक नोंदवही ची कामे करण्याबाबत त्यांच्याकडून या दोन संस्थांना करारही करून देण्यात आले. या कामासाठी अनेक संस्था इच्छुक होत्या. यातील जन परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था  ही  मागील दीड ते दोन महिन्यांपासून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत होती. त्यांना जाहीर प्रगटन काढू असे म्हणून वेळोवेळी गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी वेळ मारून नेली. परंतु अशा प्रकारचे कोणतेही जाहीर प्रगटन न काढतात परस्पर दोन संस्थांना सदरील कामे एकाच छताखाली मिळवून दिली. याप्रकरणी गटविकास अधिकारी श्री. बेले यांची ची चौकशी करावी व या कामासाठी इच्छुक असलेल्या सर्व संस्थांना त्यांचे प्रस्ताव सुरू करावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

1 comment:

  1. अधिकारी अशाप्रकारे भ्रष्टाचार करत असतील तर जनसामान्यांनी कोणाकडे जावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पैशाच्या जोरावर सर्वकाही मिळविता येते हे यातून सिद्ध होत आहे यास आळा बसलाच पाहिजे.

    ReplyDelete