तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

गणेशोत्सव व्याख्यानमालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगीतिक अभिवादन


सेलू, दि.२ ( प्रतिनिधी )  : येथील ऑनलाईन गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या चौथ्या समारोपाच्या सत्रात सोमवार ( ता. ३१ ) रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सांगीतिक अभिवादन करण्यात आले. 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ' कंबर बांधून उठ घाव झेलायला ,  महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया  ' हे गीत आणि  नूतन विद्यालयातील मराठी विषयाचे सहशिक्षक सुरेश हिवाळे यांनी लिहिलेले , संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीतबद्ध केलेले  ' स्वातंत्र्य अन् न्यायाचे जाणलेस तू मर्म ' , ' शेतकऱ्यांचा , कामगारांचा घेतलास तू कैवार ' या गितांतून अभिवादन करण्यात आले. या गितांचे सादरीकरण गीत मंचचे विद्यार्थी वरद दलाल, निलेश दिशागत, गायत्री कुलकर्णी , सायली पांडव, अनुष्का हिवाळे यांनी केले. त्यांना गिरीश दिक्षित यांची साथ लाभली. या प्रसंगी  हिवाळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आणि कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की , ' लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मुळ पिंड हा शाहिराचा होता. ते जे जीवन जगले, त्यांनी जे पाहिले , अनुभवले तेच वास्तव चित्रण आपल्या साहित्यातून केले. म्हणूनच त्यांचे साहित्य काळजाचा ठाव घेते.'
कार्यक्रमात गणेशोत्सव व्याख्यानमालेच्यावतीने सेवानिवृत्ती निमित्त व्याख्यानमालेचे अध्यक्ष व नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांचा व्याख्यानमालेचे सचिव गिरीश लोडाया , प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी, तर आश्विनी कुलकर्णी यांचा मंजूषा बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
या नंतर औरंगाबाद येथून मालीनी घन जोशी व वंदना घन यांच्या सूगम गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी गंगाधर कान्हेकर, प्रा. देविदास ढेकळे , सुशिल ठोंबरे , भालचंद्र गांजापुरकर यांनी पुढाकार घेतला.

फोटो ओळी : सेलू ( जि.परभणी ) येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगीतिक अभिवादन करण्यात आले.

पूर्ण...

No comments:

Post a comment