तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

मंगरुळपीर येथे मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनी भुमीपुञांचा सत्कार


(फुलचंद भगत/मंगरूळपीर)
दि.१ सप्टेंबर म्हणजे मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन, या दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींच्या भेटी घेवून त्यांना मराठा सेवा संघाची परीवर्तनाची भूमिका आणि वाटचाल या बद्दल अवगत करणे या उपक्रमांतर्गत मंगरुळपीर तालुक्यात नव्यानेच रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचा सामाजिक अंतर राखून सत्कार करण्यात आला.
       सुभाष पवने हे मुळचे मानोरा तालुक्यातील साखरडोह या गावचे. परंतू त्यांची शिक्षक म्हणून संपूर्ण सेवा जिल्हा परिषद हायस्कूल,मंगरुळपीर येथे झाली.गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर मधले काही वर्षे ते किनवट या परजिल्ह्यास सेवेत होते.पण याच महिन्यात ते गटशिक्षणाधिकारी म्हणून मंगरुळपीर पंचायत समिती येथे रुजू झाले. तालुक्याच्या शिक्षणाची धुरा भूमीपुत्राच्या खांद्यावर आल्याने नक्कीच त्यात सकारात्मक बदल दिसतील यात तालुकावासीयांना शंका नाही.मराठा सेवा संघ वर्धापनदिनी आपल्या गावच्या या अधिकारी भूमीपुत्राचा सत्कार करतांना मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मा.केद्रप्रमुख प्रकाश धोटे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गावंडे,निलेश तुळजापुरे,गोपाल सुडके,नितिन साठे, संजय तेलंग, धिरज महल्ले,रुपेश धोटे,आशिष खेडकर,शेखर देशमुख,प्रविन सावके, विवेक इंगोले आदींची ऊपस्थित होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment