तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

राष्ट्रवादी चित्रपट सेलच्या मराठवाडा विभागस्तरीय कार्यकारिणी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जाहीर


परळी (दि. १६) ---- : राष्ट्रवादी चित्रपट ,साहित्य,कला व संस्कृतिक सेलच्या मराठवाडा विभागाच्या विविध पदाधिकारी यांची महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्राच्या तळागाळातील कलावंतांच्या मूलभूत प्रश्नांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी हा सेल सक्रिय झाला असून ,मराठवाड्यात या सेल चे डॉ.सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली जोमात काम सुरू केले असून गावपातळीवर पक्षाचे विचार ध्येय धोरणे पोहोचविण्यासाठी , पक्षवाढीसाठी कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहेत.

या वेळी  मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते उस्मानाबाद, परभणी ,बीड या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या या वेळी देण्यात आल्या. 

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वृद्ध, अपंग, कलावंत लोककलावंत यांना काही मदत करता येऊ शकते का यावर धनंजय मुंडे साहेबांनी आलेल्या कलावंतांच्या समवेत अभ्यासपूर्वक  चर्चा केली.

आगामी काळात मराठवाड्यात या सेल च्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव, मेळावे, कार्यशाळा , स्पर्धा, चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत, कलावंतांच्या आरोग्य, जीवन विमा, रोजगार, रेशन आदी प्रश्न आवश्यक प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. सुधीर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात जवळपास पाच हजार कलावंतांचे मजबूत संघटन तयार झाले असून,सर्व स्तरातील कलावंतांची कलेनिहाय वर्गवारी करून विविध समस्या सोडवण्यात येणार आहेत.

या वेळी विशाल शिंगाडे- उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, राजाभाऊ गोंधळी गायकवाड - उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष, पवन वैद्य - उस्मानाबाद सरचिटणीस, प्रकाश आबा ढोले - परभणी जिल्हाध्यक्ष, सचिन आडे- परभणी जिल्हा कार्याध्यक्ष, adv संतोष वारे- बीड जिल्हा कार्याध्यक्ष, विकास वक्ते - बीड जिल्हा उपाध्यक्ष, प्रा. राजेंद्र बरकसे - बीड जिल्हा सरचिटणीस यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून नियुक्तिपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला  राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम , राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ह. भ. प. कोकाटे महाराज , बीड जिल्हा चित्रपट व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष कुमार पुराणिक आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment