तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

परळी मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत व नियमित करा - धनंजय मुंडे यांचे एमएसईबी अधिकाऱ्यांना सक्त निर्देशतीन तास आढावा घेत सुचवल्या अनेक उपाययोजना

परळी (दि. १४) ---- : परळी येथील विश्रामगृहात तीन तास चाललेल्या आढावा बैठकीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत व नियमित करण्याबाबत सक्त निर्देश दिले असून, परळी व अंबाजोगाई तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होऊन विविध सबस्टेशन वरील अधिकच ताण कमी करण्याबाबत विविध उपायही ना. मुंडेंनी सुचवले आहेत.

परळी शहर, ग्रामीण तसेच अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश भागात विजेचा लपंडाव नित्याचा झाला असून त्याला रोखण्याबाबत विविध उपाययोजना कराव्यात, त्याचे प्रस्ताव तातडीने दाखल करावेत असे निर्देश या बैठकीत ना. मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील साहेब, महानिर्मितीचे सीजीएम शिंदे साहेब, बीडचे अधीक्षक अभियंता कोळप, उपकार्यकारी अभियंता कुरेशी, परळीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अंबडकर, असिस्टंट इंजिनिअर कटके, जीलानी, मडावी, गित्ते, दीपक मुंडे, परळी चे तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार रुपनर, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नप गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, नगरसेवक चंदूलाल बियाणी, दीपक देशमुख, गोविंद मुंडे,प्रा. डॉ. मधुकर आघाव,  चेतन सौन्दळे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सूर्यभान मुंडे, उपसभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, माऊली गडदे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती शिवहार भताने यांसह आदी उपस्थित होते.

जीएसआर या सर्वात जुन्या ३३ केव्ही सबस्टेशन वरून सारडगाव, धर्मापुरी, पट्टीवडगाव व उजनी या चार विभागात वीज पुरवली जाते. या सबस्टेशन वर जास्तीचा ताण पडत असल्याने सतत वीज पूरवठा खंडित होत असून विद्युत वाहकही नेहमीच जळत आहेत. यापैकी धर्मापुरी, पट्टीवडगाव आणि उजनी या तीन विभागांना गिरवली या मोठ्या व अधिक क्षमतेच्या सबस्टेशन वरून वीजपुरवठा करून जीएसआर वरील ताण कमी करता येईल, यासाठी रेल्वे विभागाची परवानगी व अन्य परवानग्या यासाठीचा प्रस्ताव दोन दिवसांच्या आत सादर करावा असे निर्देशही यावेळी ना. मुंडेंनी दिले.

सिरसाळा, पोहनेर, नागापूर या भागातील कंडकटर रिप्लेसमेंट (विद्युत वाहक बदलणे) बाबत तसेच तळेगाव ते पोहनेर ही ६० किमी लांबीची लाईन जोडणे बाबतही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परळी शहरातील लोडशेडिंग बंद करण्याच्या दृष्टीने १०० क्षमतेचे २० ट्रान्सफॉर्मर मागितले असून, आयपीडिसी योजनेतून अन्य ठिकाणी मिळालेले व सध्या वापरात नसलेले ट्रान्सफॉर्मर्स उपलब्ध करून देत हा प्रश्न देखील मिटवता येईल असे ना. मुंडे म्हणाले.

ऑनलाईन व ऑफलाईन बिलातील घोळ, नागरिकांच्या वाढीव बिलाबाबत च्या तक्रारी, तसेच वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर व अन्य मागण्यांचे प्रस्ताव वेळीच दाखल न केल्याबाबत ना. धनंजय मुंडे यांनी मुख्य अभियंता तसेच अधीक्षक अभियंता यांचेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांच्या वाढीव बिलाबाबतच्या तक्रारी तात्काळ न दूर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा देखील दिला आहे.

परळीत धनंजय मुंडेंचा सहा तास जनता दरबार

दरम्यान परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज मतदारसंघातील लोकांच्या कामांना तब्बल सहा तास वेळ देत जनता दरबार घेतला. यावेळी अनेक निवेदने, मागण्या - प्रश्न, अडचणी आदी समजून घेत बहुतांश प्रकरणे जागच्या जागीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. या जनता दरबारास मतदारसंघातील प्रमुख अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते. शेकडो लोकांनी यावेळी ना. मुंडे यांचेकडे आपले गाऱ्हाणे यावेळी मांडले.

No comments:

Post a comment