तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

पानकनेरगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क लोकवर्गणीतून व श्रमदाणातून बनवला रस्ता


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

४ वर्षे केला पत्रव्यवहार अखेर प्रशासनाची कूंभ कर्ण झोप पाहून
चक्क शेतकर्यांनीच बनवला लोकवर्गणी व श्रमदाणातून रस्ता
शेतकऱ्यांना काढावी लागत होती चिखलातून वाट
जेशीबिच्या साह्याने मूरूम टाकून बनवला रस्ता
स्वातंत्र्याच्या संत्तर वर्षांनंतरही चिखलातून करावा लागतो खडतर प्रवास
पांदन रस्त्याची दुरवस्था शेतकरी त्रस्त पण मात्र सत्ताधारी मस्त
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील 
रस्त्याची वारंवार प्रशासनाकडे मागणी करून
प्रशासनाची कूंभ कर्ण झोप पाहता
अखेर शेतकर्यांनी स्वताच्याच लोकवर्गणी व श्रमदाणातून रस्ता बनवला आहे
७२ वर्षाच्या स्वतंत्रापासून पानकनेरगांव येथील अजूनही लोक विकासापासून वंचित आहे,
हे आज उदाहरण आहे
 पानकनेरगांव ते महाळशी ग्रा, मा, ६ कि,मि १०९ क्र. रस्ता आहे तर ईतर जिल्हा मार्ग सूद्धा जोडलेला आहे तर 
या रस्त्याने उन्हाळ्यात वाहतूक प्रवाशांची नेहमी वर्दळ असते महाळ्शी,शेगाव,दाताडा, अजेगांव, अनेक गावचे लोक प्रवास करतात
परंतू पावसाळा सूरू झाला की  हा रस्ता  संपूर्ण चिखलमय होतो मग त्यामुळे माणसांना तर सोडाच जनावरांना सूद्धा चालतायेत नाही हा रस्ता  संपूर्ण चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागते त्यामुळे वाहतूक प्रवाशी व शेतकरी अडचणीत सापडला आहे
रस्त्याची दुरवस्था झाल्याने बैलजोडी चाकापर्यत फसत आहे
चिखलाने माखलेले रस्त्यावरून पायदळ चालणे कठीण झाले आहे शेतात खत कसे न्यावे यांत्रीकीकारणामूळे शेतीमध्ये पेरणी,अंतरमशागत,यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात व तसेच मजूर काम करायला कसे जातील याची चिंता शेतकर्यांना भेडसावत आहे
शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकर्यांना सोईचे होईल याकरिता  रस्त्याचा उपयोग होतो परंतु तालुक्यात काही पांदन रस्ते तर ईतर जिल्हा मार्ग सूद्धा चिखलाने गिळंकृत झाल्याले दिसत आहे
स्थानिक प्रशासनाच्या निद्रीस्त अवस्थेमूळे शेतकरयांना हाल भोगावे लागत आहेत
पानकनेरगांव येथील शिवराज कूबडे व ग्रामस्थांनी रस्त्याबाबत अनेकदा  सार्वजनिक बांधकाम मंत्री संबंधित रस्त्याला निधी उपलब्ध करुन देण्यात यावा  यासाठी पत्र व्यवहार करून अनेकदा पाठपूरावा केला 
परंतु कूठलेच लोकप्रतिनिधी व निद्रीष्ट शासनाने शेतकर्यांच्या मागणीला
न्याय दिला नाही
जाग असुन झोपेचं सोंग घेणार्या  प्रशासणाची कूंभ कर्ण झोप पाहता 
त्यामुळे चक्क विभागातील शेतकर्यांनी  लोकवर्गणीतूनच  एक लाख रुपये निधी जमा करून जेसीबिच्या साहाय्याने मूरूम टाकून  रस्ता बनवण्याचे काम हाती घेतले आहे
पण मात्र एकही लोकप्रतिनिधी व अधिकारी काम कसे करत आहेत हे बघण्यासाठी डोकावुन सूद्धा बघीतले नाही
परंतू  जमा केलेल्या पैश्यात किती  रस्ता होणार त्यामुळे लोकप्रतिनिधी व शासनाने लक्ष घालून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत
लोकवर्गणी व श्रमदाणातून रस्ता तूर्तास ये- जा करण्यायोग्य झाला आहे त्यामुळे शेतकर्याची तात्पूरती व्यवस्था झाली त्यामुळे शेतकर्यांचे या उपक्रमाचे कौतुक करीत आहे 'गाव करी;ते राव न करी याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली एकीचे बळ दाखवून दिले पण मात्र प्रशासण अजूनही उदासीन आहे त्यामुळे संतापही व्यक्त केला जात आहे
राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारत असून खेडोपाडी रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. मात्र याला अपवाद ठरतो आहे तो म्हणजे पानकनेरगांव येथील  स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावकऱ्यांना चांल्या रस्त्याची सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना भर पावसात चिखलातून खडतर प्रवास करावा लागतो आहे.
ग्रा,मा १०९ क्र रस्त्याचे आतापर्यत साधे खडीकरणसुध्दा करण्यात आलेले नाही.पानकनेरगाव ते महाळशी रस्त्याची अवस्था चिखलाने माखलेल्या शेतशिवारातील पांदन रस्त्यांपेक्षाही वाईट झाली आहे.
प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाºया गावकºयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी वारंवार केली आहे

पानकनेरगांव ते महाळशी हा रस्ता रिसोड सेनगाव राज्य महामार्ग ला जोडणारा आहे हा
मुख्य रस्ता असल्याने गावकºयांना प्राथमिक गरजांसाठी पानकनेरगांवला  सतत येजा करावी लागते. गावातील अनेकजन कृषि साहित्य, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, आठवडी बाजार, किराणा बाजार, जनरल स्टोअर्स, मेडिकल, शाळेसाठी विद्यार्थ्यी पानकनेरगांवला येत असतात.
रस्त्याने जाणाºया नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो
शेतकऱ्यांना रस्त्याची पायाभूत सुविधादेखील मिळत नसल्याने ..,. शेतकºयांचा शासनाविरोधात संताप अनावर होत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने.... तालुक्यातील पानकनेरगांव शेतशिवारात  दोन किलोमीटर पांदन रस्त्याच्या चिखलातून प्रवास करणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे.
रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत आहे. 
 यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: वाट काढत आहे

मानकेश्वर   रस्ता ते गायरान शेतापर्यंत दोन किलोमीटर  रस्ता मागील कित्येक वर्षापासून चिखलमय आहे. या चिखलात शेतकरी स्वत: गाडी ओढून शेतीत जाण्यासाठी कसरत करतो आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती दूर अंतरापर्यत असल्याने  शेतीसाहित्य शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे अनेकदा बैलांना देखील येथून चालणे शक्य होत नाही.त्यामुळे अनेकदा एकमेकांची मदत घेवून एकमेकांची चिखलात रुतलेली बैलबंडी शेतकऱ्यांना बाहेर काढावी लागते. पावसाची संततधार सतत सुरु असल्याने येथील चिखल वाढला असल्याने  कमरे ईतका
चिखल  कापत रस्ता काढावा लागतो


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो नंबर .8007689280

No comments:

Post a comment