तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

सेलू शहर मध्यवर्ती बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी पळविले
सीसीटीव्हीचे एचडीआर 

सेलू ,दि.४ ( प्रतिनिधी ) : सेलू येथील पाथरी रस्त्यावरील  मार्केट यार्ड परिसरात असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेत गुरुवारी (३ सप्टेंबर ) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेत प्रवेश करत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शुक्रवारी (४ सप्टेंबर) सकाळी बँकेचे व्यवस्थापक एस.जी.मगर यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. 
पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, फौजदार जस्सी यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे शटर वाकवत बँकेत प्रवेश करत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना तिजोरी फोडता आली नसल्याचे दिसून आले. यावेळी चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. सीसीटीव्हीचे एचडीआर पळवल्याचेही पाहणी केल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आले. 
तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याने तिजोरीतील रक्कम चोरट्यांना लांबवता आली नाही.  बँकेच्या तिजोरीत दोन लाख ८० हजार ४१९ रुपये असल्याची माहिती यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी दिली.
दरम्यान, श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. या प्रकरणी बँक अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलिस 
निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्दर्शनाखाली अधिक तपास पोलिस करत आहेत.
 
...

No comments:

Post a comment