तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

पाच दिवसात वीजेचा प्रश्न सुटणार आ.रत्नाकर गुट्टे


नितीन राऊत यांनी तातडीने दिले आदेश  आरूणा शर्मा
पालम गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पालम-पुर्णा-गंगाखेड या तिन्ही तालुक्यातील कृषि व गावठाण डिपी नादुरुस्त हो़ण्याचे प्रमाण वाढले होते जवळपास दीडशे ट्रान्सफॉर्मर आईल व दुरुस्ती अभावी पडून होते. त्यामुळे मतदार संघात्तील शेतकरी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. म्हणून आ. रत्नाकर गुट्टे यांनी आज उर्जामंत्री नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेत मतदार संघातील समस्यांचा पाढा वाचला यावर उर्जामंत्री राऊत यांनी तातडीने सबंधीत अधिकाण्यांना आदेश देत येत्या चार ते पाच दिवसात मतदार संघातील संपुर्ण रोहीत्र बदलून देण्याचे आदेश दिले आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पालम पुर्णा व गंगाखेड या तालुक्यातील कृषिपंप आणि गावठाण डिपी नादुरुस्त झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. केवळ आईल अभावी ५५ रोहीत्र नादुरुस्त झाले होते.यामध्ये गंगाखेड तालुक्यातील २६ पालम-६,पुर्णा-१२६ असे एकूण १५८ रोहीत्र नादुरुस्त झाले होते.आईल आणि दुरुस्तीसाठी वारवार विनंत्या करूनही विज वितरण कंपनीकडून प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे १६ सप्टेबर रोजी आ.रत्नाकर गुट्टे यांनी उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत महावितरणचे संचालक दिनेशचंर्द्र साबू आणि  महावितरचे अध्यक्ष असीनकुमार गुप्ता यांची भेट घेवून लेखी निवेदनाद्वारे मतदार संघासाठी तात्काळ रोहीत्र देण्याची मागणी केली. यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने संबधीत अधिकाण्याना आदेशीत करत येत्या चार ते पाच दिवसात गंगाखेड विधानसभा मतदार संघात १५८ रोहीत्र बसविण्याचे आदेश दिले आहे.त्याच बरोबर दिनेशचंद्र साबू आणि असीनकुमार गुप्ता यांनी तातडीने परभणीच्या अधिक्षक अभियंत्याशी भ्रमनध्वनीवर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आदेशीत केले. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात  पालम, पुर्णा, गंगाखेड  या तिनही तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार,आहे.आ.गुट्टे यांनी शेतकण्यांच्या प्रश्नावर उर्जामंत्र्याची भेट घेवून मार्गी लावल्याबददल शेतकण्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

No comments:

Post a comment