तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त रवि कांदे यांच्या हस्ते सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी राजेश गित्ते यांचा भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 
      बीड जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य, हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष,   भाजपा  युवानेते राजेश हरिश्चंद्र गित्ते यांचा आज दि. 11 सप्टेंबर रोजी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. शहरातील साईनाथ मंदिर येथे भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस निमित्ताने भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
      भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते हे संकट समयी आपण नेहमी प्रत्येक घटकासाठी मग तो शेतकरी,विद्यार्थी, दुर्बल,वंचित यांच्या साठी विविध आंदोलने करताना आम्ही पाहिले आहे.आपण हरिसुख प्रतिष्ठाण च्या माध्यामातून गेली आठ वर्ष आपल्या वडीलांच्या स्मणार्थ समाज कार्य करून प्रत्येक घटकाला आपल्या परिने मदत करत आहात .आपले समाज कार्य करत असताना काय मिळेल याची अपेक्षा ना करता प्रत्येकाच्या मदत करण्याचा आपला उदद्ेश वेळोवेळी संकट प्रसंगीदिसुन आलेला आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारं सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन रवि कांदे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment