तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

गोदावरी मल्टीस्टेटच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नावे जाहीर

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३ _ मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या गोदावरी मल्टीस्टेटच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील गुणवंत शिक्षकांना प्रसिद्ध ग्रामीण कलावंत व गोदावरी मल्टीस्टेटचे संस्थापक सचिव कै मधुकर बैरागी (वैष्णव) यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील ११ गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याची माहिती  गोदावरी मल्टीस्टेटचे प्रभाकर पराड यांनी दिली आहे. 
             गोदावरी मल्टीस्टेट गेवराईच्या वतीने यावर्षीपासून कै मधुकर बैरागी यांच्या स्मृति प्रीत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहेत. मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ११ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रवीण शिवाजीराव पंडित यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या निवड समितीने पुढील शिक्षकांची यासाठी निवड केली आहे. त्यांच्या नावाची घोषणा गोदावरी मल्टीस्टेटच्या वतीने दि ४ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यातील, दिनकर तुळशीराम शिंदे ( राजमाता जिजाऊ विद्यालय रानमळा ), शिवाजी दत्तात्रेय झेंडेकर ( जि प मा शाळा गेवराई ), संजय उमराव पांढरे ( जि प मा शाळा धोंडराई ),  विशाल पांडुरंग कुलकर्णी ( जि प प्राथमिक शाळा राजपिंपरी ), जगदीश भागूजीराव मरकड (कें प्रा शाळा  तलवाडा), श्रीमती रोहिणी गायकवाड ( तालुका गेवराई ),  श्रीमती मंजुषा घुगे ( प्राथमिक शाळा नंबर २ गेवराई ) यांचा समावेश आहे तर औरंगाबाद जिल्ह्यातील विठ्ठल शंकरराव सावंत ( तालुका पैठण ),  गवांदे संजय शेषराव ( जि प माध्यमिक शाळा विहामांडवा),  बुळे हरीश ( जि प प्राथमिक शाळा तांदुळवाडी ),  श्रीमती शुभांगी सुनील वारके (केंद्र बिडकीन) यांचा समावेश आहे. वरील कै मधुकर बैरागी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या  शिक्षकांना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करून लवकरच पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गोदावरी मल्टीस्टेटच्या वतीने आमचे पत्रकार सुभाष मुळे यांना देण्यात आली. 
       यावेळी चेअरमन सौ सविता प्रभाकर पराड, संचालिका रुक्सना अनिस शेख, श्रीमती रेणुका मधूकर वैष्णव, ज्योती प्रविण पंडित, मनिषा गणेश शहाणे, सुरेखा कल्याण स्वामी, पदमीन गोपीनाथ घुले, अनिता पांडूरंग निवारे,वसुधा वासुदेव उमापूरकर, भारती मडकर व शुभदा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment