तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

डोणगांव येथे माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहीमेला सुरवात

डोणगांव :- ( जमील पठाण) 15

माझे कुटुंब माझी जवाबदारी
कोविड19(कोरोना)मुक्त महाराष्ट्र 
या मोहिमे अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाची व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून गावातील प्रत्येक व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करून घ्यावी,आपल्याला किंवा कुटुंबातील सदस्याला काही लक्षणे असल्यास आरोग्य पथकाला निःसंकोचपणे सांगावे.जेणेकरून स्थानिक प्रशासनाला व आरोग्य विभागाला उपाय योजना करता येतील.
या वेळी आरोग्य पथकाला डोणगांव ग्राम पंचायत च्या वतीने,थर्मल गन व पल्स ऑक्सि मीटर चे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित बुलढाणा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्री राजेंद्र पळसकर,मेहकर पंचायत समितीचे सभापती श्री निंबाजी पांडव, ग्राम विकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर चनखोरे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री किशोरकुमार बिबे,डोणगांव पोलीस स्टेशन चे नितीन     
खराडे, आरोग्य सेवक बळी साहेब,,ग्राम पंचायत कर्मचारी, आशा वर्कर.उपस्थित होते

No comments:

Post a comment