तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत सहभागी व्हा-बबनभाऊ गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
अपघाती किंवा या प्रकारच्या कारणामुळे दुर्देवी निधन झाल्यास प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेतून दोन लाख रूपये मयताच्या वारसास मिळत असून या योजनेचा अधिकृत फॉर्म भरून नागरिकांनी सहभागी व्हावे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी केले आहे.
नागदरा ता.परळी येथील विजय श्रीरंग नागरगोजे यांचा दुर्देवी घटनेत मृत्यू झाला होता. निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुचिता विजय नागरगोजे यांना वारस म्हणून प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेतून दोन लाख रूपये देण्यात आले. प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत सहभागी होण्यासाठी पंचायत समितीमधून फॉर्म भरून घेणे आवश्यक असून शासकिय बॅंकेत बचत खाते असावे, वय वर्ष 18ते 50 आवश्यक असून आपल्या बॅंकेच्या बचत खात्यातून वर्षाला 330 रूपये कमी होतील. त्या व्यक्तीच्या कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. अधिक माहितीसाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती परळी यांच्याशी संपर्क साधावा तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती व जीवन सुरक्षा या दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बबनभाऊ गित्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a comment